महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 26, 2021, 11:25 AM IST

ETV Bharat / state

सिरसाळ्याच्या 'खाकी' साठी धोकादायक 'रस्ता', सांडपाणी मुरते दारातच

पोलीस निवास स्थाना समोरील बनवलेला रस्ता अंत्यत नियोजन शुन्य बनवला आहे. सिरसाळा ग्रामपंचायत अंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदाराने सिमेंट रस्ता बनवताना चढउतार पाहून रस्ता बनवला नाही. पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक प्रवाह विचारात घेतले नाहीत,

सिरसाळ्याच्या 'खाकी' साठी धोकादायक 'रस्ता
सिरसाळ्याच्या 'खाकी' साठी धोकादायक 'रस्ता

परळी (बीड) -सिरसाळा येथील पोलीस वसाहतीची सध्या दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे पोलिसांच्या वसाहतीमधील अडचणी वाढल्या आहेत. येथील सिमेंट रस्त्यालगत असलेल्या पोलिसांच्या घराजवळच सांडपाणी मुरत आहे.

सिरसाळा ग्रामपंचायतीने २५/१५ योजने अंतर्गत लाखो रुपयांचे सिमेंट रस्ते बनवले आहेत. पंरतु नाली विना रस्ते बनवले असल्याने हे रस्ते धोकादायक बनले आहेत. विशेष म्हणजे पोलीस निवास स्थाना समोरील बनवलेला रस्ता अंत्यत नियोजन शुन्य बनवला आहे. सिरसाळा ग्रामपंचायत अंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदाराने सिमेंट रस्ता बनवताना चढउतार पाहून रस्ता बनवला नाही. पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक प्रवाह विचारात घेतले नाहीत, त्यामुळे पाणीवाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.

गावात केलेला नवीन सिमेंट रस्ता पोलीस निवास स्थानाच्या ऐन दारात आहे, रस्ता व निवासाच्या दरवाज्याचे अंतर केवळ १० - १२ फूटाचे आहे. रस्ता निवास स्थानाच्या चौकटी पेक्षा उंच झाला आहे, रस्ता सोबत नाली बनवली नाही, यामुळे घरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावता येत नाही. सांडपाणी पोलीस राहतात त्या घराच्या परिसरातच मुरत आहे. शिवाय आता पावसाळा तोंडावर आहे. त्यावेळी पावसाचे पाणी घरात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाळ्या पूर्वी ही समस्या सोडवावी-

पोलीस निवासास्थाना समोर बनवलेल्या सिमेंट रस्त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला अडचण निर्माण झाली आहे. तसेच पावसाळ्यात हा त्रास आणखी वाढू शकतो, त्यामुळे ग्रामपंचायतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या ठिकाणच्या नालीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details