महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटरची पायपीट - खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही

पीक विम्याचा हप्ता भरूनही संपूर्ण गावाला योजनेपासून दूर ठेवल्याच्या निषेधार्थ आपेगावातील शेतकऱ्यांनी चक्क 25 किलोमीटर चालत जात, अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

बीडच्या आपेगावातील शेतकऱ्यांचा मोर्चा

By

Published : Sep 14, 2019, 5:32 PM IST

बीड -जिल्ह्यातील आपेगावातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरूनही गावाला या योजनेपासून दूर ठेवल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. यावेळी शेतकऱ्यांनी २५ किलोमीटरची पायपीट करत अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयावर धडक मारली.

आपेगावातील शेतकऱ्यांनी पिक विमासाठी अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला

हेही वाचा... केंद्रासह राज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी टाळावी; आरबीआय अंतर्गत कार्यसमुहाची शिफारस

या मोर्चात महिला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा... रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी विशेष खिडकीतून १० हजार कोटी; निर्यातवाढीसाठी विविध योजना अर्थमंत्र्यांकडून जाहीर​​​​​​​

अंबाजोगाई तालुक्यामधील आपेगाव येथील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरूनही सन २०१८ साली खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. विमा कंपनीने हे गावच तांत्रिकदृष्ट्या या योजनेपासून वंचित ठेवले. ग्रामस्थांनी यापूर्वी चारवेळा उपजिल्हाधिकारी, कृषी कार्यालय यांना निवेदने दिली. मात्र याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी शनिवारी पायी मोर्चा काढला. ग्रामस्थांना पीकविम्याची रक्कम तात्काळ द्यावी, गुरांना चारा उपलब्ध करून द्यावा, गावात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा विविध मागण्या यावेळी शेतकऱ्यांकडून मांडण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details