महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 8, 2019, 11:49 AM IST

ETV Bharat / state

औरंगाबादेत वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याचा वाद, इम्तियाज जलील यांना डावलले

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या असून या पत्रिकेत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव छापण्यात आले. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांचे नाव टाकले नाही. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या गेटसमोर निदर्शने केली.

एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते निदर्शने करताना

औरंगाबाद -सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याचा एमआयएमच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नामकरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न टाकल्यामुळे तसचे त्यांना याचे निमंत्रण न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते निदर्शने करताना

नामकरण सोहळ्यासाठी महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या असून या पत्रिकेत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव छापण्यात आले आहे. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांचे नाव टाकले नाही. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या गेटसमोर निदर्शने केली.

जलील यांना निमंत्रण न देऊन शिवसेनेने त्यांचा अवमान केला असल्याचा आरोप एमआयएमतर्फे करण्यात आला. महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित करून जाब विचारणार असल्याचे एमआयएमच्या महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या सरिता बोर्डे यांनी सांगितले. आंदोलनामुळे नामकरण सोहळ्यास जवळपास अर्धातास उशिर झाला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर नामकरण सोहळ्याला सुरूवात झाली. नामकरणाच्या कार्यक्रमामुळे सुरू झालेल्या या वादाने शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव किती जिव्हारी लागला हेदेखील समोर आले. मात्र, या पत्रिकेत कोणत्याच आमदार आणि खासदारांचे नाव टाकलेले नाही त्यामुळे याविषयाचे राजकारण करू नये, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details