महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2022, 7:03 PM IST

Updated : Dec 9, 2022, 7:30 PM IST

ETV Bharat / state

Chandrakant Patil : इतिहासाची माहिती घेण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणांची गरज - चंद्रकांत पाटील

आजचा पिढीला इतिहासाची योग्य माहिती व्हावी, यासाठी नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणण्याची गरज असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं. किलेअर्क (Kile Ark) येथे वंदे मातरम सभागृहाचे उद्घाटन (inaugurated Vande Mataram auditorium) चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी ते बोलत (he expressed his opinion) होते.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील

औरंगाबाद :आजचा पिढीला इतिहासाची योग्य माहिती व्हावी, यासाठी नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणण्याची गरज असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं. 2020 मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणण्याचा विचार सुरू आहे. महाराजांचा इतिहासा बाबत दोन पानांचा धडा दिलेला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत परिपूर्ण माहिती नाही. याकरिता इतिहासासाठी एक वेगळं पुस्तकच तयार करावं, असा विचार आहे. यात नव्या पिढीला या सर्वांचं कार्य कळेल, असं मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त (he expressed his opinion) केलं. किलेअर्क (Kile Ark) येथे वंदे मातरम सभागृहाचे उद्घाटन (inaugurated Vande Mataram auditorium) चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.

मार्गदर्शन करतांना तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील



वंदे मातरमला करण्यात येतो विरोध : काही ठिकाणी वंदे मातरम म्हणायलाही विरोध केला जातो, अशी टिका त्यांनी केली. मात्र हा विरोध राजकीय प्रेरनेतून असतो. मात्र वंदे मातरम नेमकं कोणी लिहिलं? कोणी गायलं याबाबत आजच्या पिढीला काहीही माहिती नाही. त्यामुळे तसा अभ्यासक्रम केल्यास शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वंदे मातरम, मराठवाडा मुक्ती संग्राम याबाबत युवकांना सविस्तर माहिती मिळेल, असं मत चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.



पाक व्याप्त कश्मीर भारताचा भाग :भारत स्वतंत्र झाल्यावर मराठवाडा एक वर्ष, एक महिना, दोन दिवसांनी स्वतंत्र झाला. त्यातही तीन संस्थान देश स्वतंत्र झाल्यावर भारतात यायला तयार नव्हती. त्यात कश्मीर देखील होते. काश्मीर भारतात आला आहे, तो आपलाच आहे. पीओके देखील आपलाच आहे. ही जी संस्थानं होती, ती भारतात सामीविष्ट करून घेण्यासाठी पोलीस ॲक्शन प्लॅन देखील करावा लागला. हा एक इतिहास आहे आणि तो अभ्यासक्रमातून मांडण्याची गरज आहे. जेणेकरून त्याकाळी स्वातंत्र्य सेनानी दिलेले बलिदान आजच्या युवकांना कळेल, असं मत चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलं.



उद्घाटन राजकीय मंडळींसाठी थांबायला नकोत :कुठलाही कामाचा शुभारंभ करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या उद्घाटनाची वाट बघू नये, ज्येष्ठ नागरिकांच्या हाताने उद्घाटन करून घ्यायला पाहिजे, असं मत चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलं. रस्ते तयार होतात, सभागृह तयार होतात. मात्र नेत्यांच्या तारखा मिळवण्यासाठी त्यांना उद्घाटनाला उशीर होतो. परिणामी काम होऊनही सात ते आठ महिने त्या जागांचा वापर सुरू होत नाही. असं न करता राजकीय मंडळींची वाट न बघता हे उद्घाटन करून घ्यायला हवीत, नंतर आमच्यासारखे नेते येऊन त्याची पाहणी करू शकतात आणि त्यात काही बदल करायचे असल्यास त्या सूचना करू शकतात, असं मत चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलं.

Last Updated : Dec 9, 2022, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details