महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती मतदारसंघात देशमुख, खोडके दोघांनाही विजयी होण्याचा विश्वास

अमरावती मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुलभा खोडके यांनी आपण विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. प्रचारादरम्यान जनतेशी साधलेला संपर्क हा विजयाची खात्री देणारा असल्याचे दोन्ही उमेदवारांचे म्हणणे आहे.

wining confidance

By

Published : Oct 20, 2019, 7:36 PM IST

अमरावती - विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी थंडावली असताना अमरावती मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुलभा खोडके यांनी आपण विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. प्रचारादरम्यान जनतेशी साधलेला संपर्क हा विजयाची खात्री देणारा असल्याचे दोन्ही उमेदवारांचे म्हणणे आहे.

दोन्हीही प्रमुख उमेदवारांना विजयी होण्याचा विश्वास

हेही वाचा -अमरावती : गीत गायनाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांचे मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन

अमरावती मतदारसंघात सुनील देशमुख हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. सुलभा खोडके या पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून यापूर्वी 2004 साली बडनेरा मतदारसंघात सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यावेळी त्या बडनेरा मतदारसंघ सोडून अमरावती मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. सुनील देशमुख आणि सुलभा खोडके यांच्यात आता थेट लढत असून प्रचारादरम्यान जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे दोन्ही उमेदवारांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा -अमरावतीमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड

दोघांनाही विजयाची खात्री असून सोमवारी होणाऱ्या मतदानादरम्यान अमरावतीकर नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात, हे 24 ऑक्टोबरला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details