महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 31, 2020, 1:22 PM IST

ETV Bharat / state

वडील दोनशे रुपये रोजंदारीवर मजूर, पण पठ्ठ्याने वसतिगृहात राहून मिळवले ९६ टक्के!

मनात जिद्द आणि चिकाटी व डोळ्यासमोर ध्येय असलं तर माणूस खडतर मार्गातूनही वाट शोधत असतो. याचाच प्रत्यय चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली या खेड्यात राहणाऱ्या अथर्व मनोहर अंबुलकरच्या यशाने येतो.

ssc examination
वडील दोनशे रुपये रोजंदारीवर मजूर..पण पठ्ठ्याने वसतिगृहात राहून मिळवले ९६ टक्के!

अमरावती -मनात जिद्द आणि चिकाटी व डोळ्यासमोर ध्येय असलं तर माणूस खडतर मार्गातूनही वाट शोधत असतो. याचाच प्रत्यय चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली या खेड्यात राहणाऱ्या अथर्व मनोहर अंबुलकरच्या यशाने येतो.

अथर्वने परिस्थितीशी दोन हात करत दहावीत ९५.८० टक्के गुण प्राप्त केले. तसेच त्याने तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला. अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली या गावात राहणारा अथर्व मनोहर अंबुलकर बापूसाहेब देशमुख शाळेचा विद्यार्थी आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वडील मनोहर अंबुलकर हे एका फोटो स्टुडिओत फक्त दोनशे रुपये रोजंदारीवर काम करतात. आई घरी शिवणकाम करते. अथर्वला दोन मोठ्या बहिणी आहेत.

घरची बिकट परिस्थिती आणि मुलाचे शिक्षण अशा परिस्थिती त्यांनी मुलाला गरिबीची जाणीव होऊ दिली नाही. अथर्व हा अभ्यासा हुशार त्यात सातत्य असल्याने त्याचा क्रमांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात लागला. याच ठिकाणी त्याने अभ्यास करून घवघवीत यश मिळवलं.

बुधवारी घोषित झालेल्या दहावीच्या निकालामध्ये त्याने ९५.८० टक्के गुण प्राप्त केले. अथर्वने विज्ञानामध्ये सर्वाधिक ९९ गुण, तर गणित व सामाजिक शास्त्रात प्रत्येकी ९७ गुण मिळवले. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील, शिक्षक वृंदांना दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details