महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 22, 2019, 11:12 PM IST

ETV Bharat / state

अमरावतीत विविध मागण्यांसाठी कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम ,बुलढाणा या पाच जिल्ह्यातील हजारो कृषी सहायक संघटनेने अमरावतीच्या विभागीय कृषी सह संचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

अमरावतीत विविध मागण्यांसाठी कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

अमरावती- विविध मागण्यांसाठी अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या पाच जिल्ह्यातील हजारो कृषी सहायक संघटनेने अमरावतीच्या विभागीय कृषी सह संचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यासाठी विभागातून हजारो कृषी सहायक एकवटले होते.

विविध मागण्यांसाठी कृषी सहायकांचे धरणे आंदोलन
कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक रखडलेली पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, पीक कापणी प्रयोग मार्गदर्शक सुचनेप्रमाणे मिळावे, कृषी सहायकांच्या प्रति नियुक्ती रद्द करणे, पोकरा योजनेत रिक्त असलेली मुख्यालये भरणे अशा विविध मागण्यांसाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, २० तारखेपासून या कृषी सहायक संघटनेकडून आंदोलन केले जात आहे. २० तारखेला काळ्या फिती लावून, एकवीस तारखेला प्रत्येक तालुका स्थरावर धरणे आंदोलन आणि आज अमरावती विभागाच्या वतीने ही धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने तत्काळ या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details