महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थिनींचा लैंगिक छळ प्रकरण : तक्रार मागे घेण्यासाठी मुलींवर दबाव

महाविद्यालयातील संजय नागे हा शिक्षक मागील काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तणूक करत होता. या प्रकरणाची तक्रार मुलींनी पोलिसांमार्फत शाळेत लावलेल्या तक्रार पेटीत दाखल केली. त्यानंतर या शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

By

Published : Mar 5, 2020, 12:53 PM IST

Representative Image
प्रातिनिधीक छायाचित्र

अमरावती -जिल्ह्यातील पथ्रोट येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या संस्था अध्यक्षाच्या शिक्षक मुलाने विद्यार्थींनींशी अश्लील गैरवर्तणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आरोपी शिक्षक संजय नागे याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, ही तक्रार मागे घेण्यासाठी विद्यार्थिनींचे पालकच त्यांच्यावर दबाव टाकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी मुलींवर दबाव

महाविद्यालयातील संजय नागे हा शिक्षक मागील काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तणूक करत होता. या प्रकरणाची तक्रार मुलींनी पोलिसांमार्फत शाळेत लावलेल्या तक्रार पेटीत दाखल केली. त्यानंतर या शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.

हेही वाचा -अहमदनगर दाम्पत्य मारहाण प्रकरण : पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले. मुलींनी गैरसमजातून ही तक्रार दिली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या पालकांवर शाळा प्रशासनाकडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव येत असल्याची चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details