महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 6, 2019, 9:11 AM IST

ETV Bharat / state

आमदार बच्चू कडूंकडून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना चारचाकी वाहन भेट

जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना विविध स्पर्धेची ठीकाणे तसेच तालुका कार्यालयांना भेट द्यावी लागते.  मात्र शासकीय वाहन नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. क्रीडा विभागालादेखील आपल्या कामांमध्ये गती मिळावी यासाठी ही गाडी भेट दिल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

kadu
आमदार बच्चू कडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले चार चाकी वाहन भेट

अमरावती - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघासाठी आलेल्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना एक नवी कोरी चार चाकी गाडी भेट दिली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय वाहन असते. मात्र, क्रीडा अधिकाऱ्याला हे वाहन दिले गेलेले नाही. क्रीडा विभागालादेखील आपल्या कामांमध्ये गती मिळावी, यासाठी ही गाडी भेट दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार बच्चू कडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले चार चाकी वाहन भेट

हेही वाचा -माकप आमदाराविरुद्ध सेना आमदारांचा रंगला कबड्डी सामना

जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना विविध स्पर्धेची ठीकाणे तसेच तालुका कार्यालयांना भेट द्यावी लागते. मात्र शासकीय वाहन नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अचलपूर मतदार संघाला जिल्हा क्रीडा विभागाने 35 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतुनच बच्चू कडू यांनी हे वाहन घेतले आहे. वाहन मिळाल्यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details