महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या मोर्शीत विघ्नहर्त्यावरही महापुराचं विघ्न....

नळ दमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे मोर्शीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे घरातील चौरंगावर विराजमान झालेले गणराय जाग्यावरच विरले. तर दोन सार्वजनिक मंडळाचे मोठे गणपती वाहून गेले आहेत.

By

Published : Sep 5, 2019, 5:20 PM IST

अमरावतीतील पूर परिस्थिती

अमरावती - विघ्नहर्ता म्हणून ज्याची ख्याती आहे. त्या गणरायाला देखील काल मोर्शी येथे अचानक आलेल्या महापुराच्या विघ्नाचा सामना करावा लागला. नळ दमयंती नदीला काल सायंकाळी मोठा पूर आल्याने मोर्शीच्या अनेक भागातील घरांमध्ये सहा सात फूट पाणी शिरले आहे. यामुळे घरातील चौरंगावर विराजमान झालेले गणराय जाग्यावरच विरले. तर दोन सार्वजनिक मंडळाचे मोठे गणपती वाहून गेले आहेत.

अमरावतीतील पूर परिस्थिती

नळ दमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे मोर्शीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यानंतर सुरक्षिततेची खबरदारी म्हणून शहरातला विज पुरवठा खंडीत करण्यात आला. दरम्यान, पेठपुरा, इंदिरा नगर, आठवडी बाजार, गाडगे नगर, राम मंदिर, गधेघाट पुरा, खोलवाट पुरा आणि सुलतान पुरा या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांसह घटनास्थळ गाठून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

दरम्यान, सिंभोरा धरण परिसरातही अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासात केव्हाही धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ शकतात. मोर्शीत काल १४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अप्पर वर्धा धरण 89 टक्के भरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details