महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2021, 7:40 PM IST

ETV Bharat / state

अमरावतीच्या चांदुर रेल्वेत पेटविली आगळीवेगळी होळी; कृषी कायद्याच्या प्रति पेटवल्या

चांदूर रेल्वेत एका ठिकाणी आगळीवेगळी होळी पेटविण्यात आली. यामध्ये तीन कृषी कायदे, कामगार विरोधी कायदे, विज बिल कायदे आदींच्या प्रति जाळून होळी दहन करण्यात आले.

Amravati holi puja  holi puja in Chandur Railway  अमरावती होलिका दहन  कृषी कायद्याच्या प्रति पेटवल्या
अमरावतीच्या चांदुर रेल्वेत आगळीवेगळी होळी साजरी..

अमरावती -चांदूर रेल्वे शहरात आगळीवेगळी होळी साजरी केली गेली. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे, कामगार विरोधी कायदे तसेच खासगीकरणाच्या विरोधात रविवारी सायंकाळी होळी साजरी करण्यात आली. गाडगेबाबा मार्केटमध्ये सीसीएन कार्यालयाजवळ कृषी कायद्यांच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकारविरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

अमरावतीच्या चांदुर रेल्वेत आगळीवेगळी होळी साजरी..
२८ मार्चला होळीचा सण सगळीकडे साजरा करण्यात आला. यामध्ये सायंकाळी मुख्यत्वे होलिका दहन करण्यात आले. मात्र चांदूर रेल्वेत एका ठिकाणी आगळीवेगळी होळी पेटविण्यात आली. यामध्ये तीन कृषी कायदे, कामगार विरोधी कायदे, विज बिल कायदे आदींच्या प्रति जाळून होळी दहन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने सपाटा लावलेल्या खासगीकरणाचाही विरोध करण्यात आला. कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे, कामगार विरोधी कायदे रद्द झालेल पाहिजे, आवाज दो हम एक है, खाजगीकरण बंद झालेच पाहिजे आदी घोषणाबाजी करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय किसान संघाचे समन्वय समितीचे विजयराव रोडगे (भाकपा), देविदास राऊत (किसान सभा), विनोद जोशी (भाकपा), नितीन गवळी (आम आदमी पार्टी), मेहमुद हुसेन, प्रा. प्रसेनजित तेलंग (प्रगतशिल लेखक संघ), विनोद लहाने, चरण जोल्हे, हरिभाऊ चव्हाण, रामदास कारमोरे (माकपा), कृष्णकांत पाटील, निळकंठ दिगडे, शैलेश डाफ, निलेश कापसे, प्रभाकर कडू, गोपाल मुरायते, पंकज गुडधे, भीमराव बेराड, अशोक गारोडे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा -बुरा न मानो होली है..!कोरोनाच्या संकटावर पोलिसाने दिला वैदर्भीय कवितांचा तडका

ABOUT THE AUTHOR

...view details