महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यकीय महाविद्यालयावरून अनिल बोंडेंची सरकारवर टीका

अमरावती येथील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दुसरीकडे पळविले. विदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावे. जनता हा अन्याय सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे.

Anil Bonde
Anil Bonde

By

Published : Jan 6, 2021, 5:04 PM IST

Updated : Jan 6, 2021, 5:34 PM IST

अमरावती - राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली होती. मात्र आता अमरावतीचे नाव वैद्यकीय महाविद्यालयातुन वगळून हे सिंधुदुर्गला नेले आहे. त्यामुळे यात आता भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर पुन्हा अन्याय केला आहे. अमरावती येथील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दुसरीकडे पळविले. विदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावे. जनता हा अन्याय सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे.

'जागाही निश्चित झाली होती'

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते. त्याप्रमाणे ते प्राधान्य क्रमाने घेण्यात आले होते. आपण पालकमंत्री असताना या महाविद्यालयासाठी दोन जागा सूचवल्या होत्या. त्यापैकी एक जागा ही निश्चितदेखील केली होती, असे डॉ. बोंडे म्हणाले. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे तसा प्रस्तावदेखील पाठवला होता.

अमरावतीऐवजी सिंधुदुर्ग आणि अलिबागला प्राधान्य

दुर्दैवाने हे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर प्राधान्य क्रम बदलण्यात आला आहे. त्यामुळे अमरावतीऐवजी अलिबाग आणि सिंधुदुर्ग येथे प्राधान्यक्रम देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे विदर्भावर विशेषतः पश्चिम विदर्भावर जिथे रुग्ण संख्या जास्त आहे, तिथे महाविकास आघाडीने अन्याय केल्याचे ते म्हणाले.

Last Updated : Jan 6, 2021, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details