महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किसन हुंडीवाले यांच्या खूनात सेवानिवृत्त पोलिसाचा हात - एसपी कलासागर

या खूनात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावडे व त्याची तीन मुले आणि १५ ते २० जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आज दिली.

By

Published : May 6, 2019, 1:19 PM IST

Updated : May 6, 2019, 4:31 PM IST

घटनास्थळ

अकोला- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांचा खून झाल्याची घटना घडली. या खुनात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावडे व त्याची तीन मुले आणि १५ ते २० जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आज दिली. या घटनेला संस्था आणि प्रॉपर्टीचे कारण असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, किसनराव हुंडीवाले हे चॅरिटी कमिशनर कार्यालयात आले होते. त्यांच्या पाठीमागे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे, त्याची तीन मुले आणि १५ ते २० लोक हेही आले. कार्यालयात त्यांचा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला. त्यामुळे चिडलेल्या श्रीराम गावंडे आणि इतरांनी त्यांना लाकडी साहित्य, फायर एस्टिंग्विशर यांनी हल्ला चढविला. त्यात ते जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मारेकऱ्यांसह तेथे असलेले पक्षकार, वकील आणि कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पळून गेले, अशी माहिती एसपी कलासागर यांनी दिली.

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर घटनेची माहिती देताना

हुंडीवाले आणि गावंडे नेमके सुनावणीसाठी आले होते की वेगळ्या कारणाने आले होते, याचा तपास लावण्यात येईल. तसेच या घटनेमागील योग्य कारण काय याचाही शोध घेण्यात येणार आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे. किसनराव हुंडीवाले यांच्यासोबत असलेल्या वकिलाला देखील मारहाण झाल्याची माहिती आहे. याची शहानिशा करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सांगितले.


घटनास्थळी मुले आणि स्वकीयांचा हंबरडा -
चॅरिटी कमिशनर कार्यालयात झालेल्या या घटनेनंतर किसनराव हुंडीवाले यांची मुले, त्यांच्या जवळचे मित्र, काही राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. मुले जोरात रडत होती. घटनास्थळीच वातावरण शोकाकुल झाले होते.

दूधवाला ते व्यापारी
किसनराव हुंडीवाले हे नाव अकोल्यातील सर्वच व्यापारी आणि राजकीय पदाधिकारी यांच्याशी परिचित होते. ते चांदुर येथे राहत होते. दूध विक्रेतापासून त्यांच्या आयुष्याला सुरुवात झाली. तसेच त्याची ओळख तिथुन निर्माण झाली. त्यानंतर ते जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवसायात आले. त्यात त्यांनी चांगले नाव कमावले, असे बरेचजण सांगतात. अगदी शांत आणि मनमिळाऊ व्यक्तीमत्व होते. त्यांच्या जाण्याने एकच खळबळ उडाली आहे.

Last Updated : May 6, 2019, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details