महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 19, 2019, 5:54 PM IST

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई

राहुरी तालुक्यातील मांजरी येथील हिंदुस्तान पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस गुप्त बातमीनुसार सहकाऱ्यांसह दारूबंदी गुन्हा याकामी छापा मारल्याची माहिती आहे. तसेच, या छाप्यात विदेशी आणि देशी मद्याचे एकून ७४ खोके ताब्यात घेण्यात आले आहेत.

पोलिसांची कारवाई

अहमदनगर - राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुमारे 3 लाख रुपये किमीतीच्या अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला अटक झाल्याने, अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांची कारवाई आणि प्रतिक्रिया
श्रीरामपूर पोलीस उपायुक्त प्रसाद सुर्वे, पराग नवलकर, सी. पी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास भरारी पथकाने अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. राहुरी तालुक्यातील मांजरी येथील हिंदूस्तान पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस गुप्त बातमीनुसार सहकाऱ्यांसह दारूबंदी गुन्हा याकामी छापा मारल्याची माहिती आहे. दरम्यान, या छाप्यात विदेशी आणि देशी मद्याचे एकून ७४ खोके ताब्यात घेण्यात आले. या दारुची किंमत अंदाजे ३ लाख २९ हजार १८४ रुपये एवढी आहे.

हेही वाचा -'वंचित' पासून दूर होणं 'एमआयएम'च्या पथ्थ्यावर पडणार?

या गुन्ह्यात आरोपी अशोक तुकाराम विटनोर याला अटक करण्यात आली असून आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई श्रीरामपूर येथील पोलीस ठाण्यातील अनिल पाटील, पी. बी. अहिरराव, के. यु. छत्रे, ए. सी. खाडे, नम्रता वाघ, राजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे, वर्षा जाधव यांनी केल्याची माहिती आहे.

हेही वाचा -काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?

ABOUT THE AUTHOR

...view details