अहमदनगर -कोरोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या अनेक रुग्णांत म्युकरमायकोसिस हा आजार होताना दिसून येत आहे. काहीसा गंभीर परिणाम होऊन प्रसंगी मृत्यू होण्याचे प्रमाण या आजारात दिसून येत असल्याने त्याबद्दल सध्या घबराटीचे वातावरण आहे. मात्र प्राथमिक लक्षणे दिसताच तपासणी आणि योग्य उपचार केल्यास रुग्णांच्या जीवाला धोका अगदी कमी असतो, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याची माहिती म्युकरमायकोसिसवर विविध उपचार आणि शस्त्रक्रिया करणारे अहमदनगर येथील गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर संजय असनानी यांनी दिली आहे.
पोस्ट कोविडमध्ये म्युकरमायकोसिस कुणालाही होऊ शकतो -
सध्या अनेक कोरोना रुग्णांची अवस्था म्युकरमायकोसिस या आजाराने गहाळ करून ठेवली आहे. एक तर हा आजार खर्चिक आहे त्यात या आजारावरील इंजेक्शनचा तुटवडा आणि अनेक व्याधी निर्माण होऊन मृत्यूची भीती असल्याने कोरोना बाधित असलेले किंवा कोरोना होऊन गेलेल्या रुग्णात या आजाराबद्दल भीतीचे वातावरण आहे. मधुमेही रुग्णांबरोबरच इतर कसलेही आजार नसलेल्या कोरोना रुग्णांतही म्युकरमायकोसिस आजार होत असल्याचे पुढे येत आहे. एकट्या नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्णांचा जीव या म्युकरमायकोसिसने घेतला आहे. तर सध्या 70 रुग्णांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आजाराबद्दल भीती असली तरी या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार घेतल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो अशी माहिती डॉक्टर संजय असनानी यांनी दिली आहे.
आता म्युकरमायकोसिस इंजेक्शनचाही काळाबाजार -