महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 19, 2021, 3:27 PM IST

ETV Bharat / state

बदनामीच्या त्रासाने मुलाच्या आई-वडिलांनी गळफास घेऊन संपवले जीवन

तुमच्या मुलावरची बलात्काराची केस मागे घेतो. त्यासाठी दवाखान्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या अशा मागणीचा तगादा लावला. दरम्यान, यामुळे बदनामीही वाढली. हा त्रास सहन न झाल्याने, अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील मुलाच्या आई-वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील दीपक सोमनाथ कुलाळ याने याबाबत राजूर पोलिसांत तक्रार दिली आहे.

राजुर पोलीस ठाणे
राजुर पोलीस ठाणे

अहमदनगर (अकोले) - तुमच्या मुलावर दाखल झालेली बलात्काराची केस मागे घेतो त्यासाठी दवाखान्याच्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या अशा मागणीचा तगादा व बदनामी सहन न झाल्याने, अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील मुलाच्या आई वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील दीपक सोमनाथ कुलाळ याने याबाबत राजूर पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादी दीपक कुलाळ याचा दुसरा भाऊ याच्यावर आरोपीने बलात्काराचा गुन्हा यापूर्वी दाखल केला आहे. त्यामुळे त्याचा भाऊ सध्या जेलमध्ये आहे. त्याबाबतच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील दाम्पत्याने बदनामीच्या भीतीने गळफास घेऊन आपले जीवन संपले. त्याबाबत बोलताना नातेवाई

'बदनामी व भीती सहन झाली नाही'

राजुर पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यात म्हटले आहे की, आरोपी मुलगी व तिचे वडील यांनी भाऊ व आई-वडिलांवर बलात्काराची केस दाखल केली आहे. ही केस मागे घेतो. परंतु, त्यासाठी दवाखाण्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या असा तगादा आरोपींकडून सुरू होता. यामुळे बदनामी व भीती सहन झाली नाही. त्यामुळे फिर्यादी दीपक कुलाल याचे वडील सोमनाथ नामदेव कुलाळ (वय 50 ) जिजाबाई सोमनाथ कुलाळ (वय 45) यांनी आपल्या राहत्या घरात लोखंडी पाइपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत राजुर पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, राजुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास राजुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करत आहेत.

हेही वाचा - पुण्यातील नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली

ABOUT THE AUTHOR

...view details