महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 7:30 PM IST

ETV Bharat / state

Dhangar Reservation: गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी, 21 व्या दिवशी चौंडी येथील यशवंत सेनेचं उपोषण मागे

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण आज अखेर 21 व्या दिवशी मागे घेण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या शिष्टाईला या ठिकाणी यश आले आहे.

Dhangar Reservation
21 व्या दिवशी चौंडी येथील उपोषण मागे

अहमदनगर- गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेच्यावतीनं उपोषण सुरू होते. रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर आज सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी यशस्वी तोडगा काढला. चर्चेचनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी मंत्री महाजन यांनी सांगितले की, सरकार धनगर आरक्षणाविषयी सकारात्मक आहे. त्यादृष्टीने पुढील पावले उचलली जातील, असंही ते यावेळी म्हणाले.


धनगर समाजाला अनुसूचित जमातीतील - एसटी प्रवर्ग आरक्षण मिळावं याकरिता यशवंत सेनेच्यावतीनं उपोषण सुरू होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी सातत्याने सकल धनगर समाजाच्यावतीनं केली जात आहे. सरकारच्यावतीनं सातत्याने उपोषणकर्त्यांशी संवाद साधला जात होता. मात्र, उपोषणकर्त्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवरुन संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

मंत्री महाजन यांनी दिले आश्वासन -मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडीतील आंदोलनाला वारंवार भेटी देत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपोषणकर्त्यांची भेटीही घेतल्या आहेत. मात्र, मार्ग निघत नसल्यानं हे आंदोलन सुरूच होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती. धनगर एस.टी. आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे महाजन यांनी सांगितलं. समाजाने उपोषण आंदोलन मागे घेत सरकारला वेळ द्यावा. ठरलेल्या वेळेत सरकार धनगर समाजाच्या योग्य तो निर्णय घेईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. महाजन म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल. तसेच 50 दिवसांत आरक्षणाबाबतची तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये आरक्षणाच्या मार्गाबाबत चर्चा होणार आहे.



नुकतेच सह्याद्री अतिथीगृहात पार पडली बैठक-धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे चार दिवसांपूर्वी बैठकदेखील पार पडली होती. धनगर समाजाच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, तसेच आमदार गोपीचंद पडळकर, राम शिंदे, दत्तात्रय भरणे व इतर धनगर समाजातील अनेक नेते व मान्यवरांची उपस्थिती होती.

हेही वाचा-

  1. Dhangar reservation in Maharashtra: धनगर आरक्षणावरील आजची सुनावणी लांबणीवर, 13 व 14 जुलैला होणार मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
  2. Nana Patole on Ramesh Bidhuri : रमेश बिधुडी यांना अपात्र करुन खासदारकी रद्द करा; कॉंग्रेसची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details