अहमदनगर- राधाकृष्ण विखे-पाटील यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी आज दुपारी सुनावणी घेणार आहेत.
राधाकृष्ण विखे-पाटलांची उमेदवारी अडचणीत; अर्जावर काँग्रेस उमेदवाराचा आक्षेप
राधाकृष्ण विखे-पाटलांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप नोंदविला आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी आज दुपारी सुनावणी घेणार आहेत.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ज्या व्यक्तीसमोर प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्रावर शिक्का मारलेला आहे. परंतु, त्याची मुदत कधी संपते, याचा उल्लेख केला नाही. नोटरी करणाऱ्या व्यक्तीची ५ वर्षांसाठी नेमणूक असते. मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे बंधनकारक असते. शिवाय प्रतिज्ञापत्रात आपण उमेदवारास व्यक्तीश: ओळखतो, असे नोटरी करणाऱ्या व्यक्तीकडून देण्यात आले नाही. तसेच ओळख म्हणून इतर व्यक्तींची स्वाक्षरी घेण्यात आलेली नाही. यासह इतर आक्षेप विखे यांच्या उमेदवारी अर्जावर सुरेश थोरात यांच्याकडून घेण्यात आले आहे.
हेही वाचा-अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचा शेकापला पाठिंबा, पवार-गडाख संबंधांमुळे शंकरराव गडाखांच्या पंखात बळ