महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​​​​​​​बारावीच्या विद्यार्थ्याची अकोल्यात गळफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यातील अकोले येथे सौरभ तात्यासाहेब मंडलिक (वय १८) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मॉडर्न हायस्कूल येथे विज्ञान शाखेत बारावीचा विद्यार्थी होता.

By

Published : Mar 2, 2019, 8:08 AM IST

सौरभ मंडलिक

अहमदनगर- जिल्ह्यातील अकोले येथे सौरभ तात्यासाहेब मंडलिक (वय १८) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मॉडर्न हायस्कूल येथे विज्ञान शाखेत बारावीचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा सुरू होती. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

मॉडर्न हायस्कूल

अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंपामागे डॉ. मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभने गळफास घेऊन जीवन संपविले. सौरभने आत्महत्या केली त्या खोलीत वह्या पुस्तके अस्तव्यस्त पडलेली होती. तसेच त्याची परीक्षा सुरु होती. मृत सौरभचे वडील शिक्षक असून चुलते डॉक्टर आहेत. तो अकोल्यात चुलते डॉ. मंडलिक यांच्याकडे राहत होता. घरची सर्व मंडळी लग्नासाठी बाहेर गेली असल्यामुळे सौरभ घरी एकटाच होता. दिवसभर फोन उचलत नसल्याने रात्री ९ वाजता कुटुंबीय घरी आल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली.

याबाबत अकोले पोलिसांना माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक काळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर सौरभचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आत्महत्यचे कारण अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details