महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 1, 2019, 12:41 PM IST

ETV Bharat / sports

चीन ओपन : यूएस ओपनची विजेती बियांका दुसऱ्या फेरीत दाखल

पहिल्या फेरीत बियांकाने बेलारुसच्या अलीकसांद्रा सासनोविकला ६-२, २-६, ६-१ ने पराभूत केले. ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या रॉजर्स करंडक स्पर्धेनंतर बियांकाचा हा लागोपाठ १४ वा विजय आहे. दुसऱ्या फेरीत तिचा सामना एलिस मर्टेसशी होणार आहे. यूएस ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बियांकाने मर्टेसला पराभूत केले होते.

चीन ओपन : यूएस ओपनची विजेती बियांका दुसऱ्या फेरीत दाखल

बीजिंग -यंदाची यूएस ओपन स्पर्धेची विजेती टेनिसपटू बियांका आंद्रेस्कूने आपला विजयी धडाका कायम ठेवला. कॅनडाच्या १९ वर्षीय बियांकाने सध्या सुरु असलेल्या चीन ओपनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. बियांकाने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला आहे.

हेही वाचा -आयपीएल २०२० : लिलावाची तारीख ठरली, खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघाकडे असणार ८८ कोटी!

पहिल्या फेरीत बियांकाने बेलारुसच्या अलीकसांद्रा सासनोविकला ६-२, २-६, ६-१ ने पराभूत केले. ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या रॉजर्स करंडक स्पर्धेनंतर बियांकाचा हा लागोपाठ १४ वा विजय आहे. दुसऱ्या फेरीत तिचा सामना एलिस मर्टेसशी होणार आहे. यूएस ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बियांकाने मर्टेसला पराभूत केले होते.

एलिस मर्टेसने पहिल्या फेरीत क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकला ६-२, ६-३ ने पराभूत केले होते. या खेळाडूंव्यतिरिक्त जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या एलिना स्वितोलिनाने उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. अतिशय रंजक झालेल्या सामन्यात तिने चीनच्याच वांग याफानला ७-६ (५), ७-६ (१) ने मात दिली होती.

१९ वर्षीय महिला टेनिसपटू बियांका आंद्रेस्कू हिने यूएस ओपन २०१९ ची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच कॅनेडिअन खेळाडू ठरली होती. बियांकाने अंतिम सामन्यात २३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स हिचा ६-३, ७-५ असा पराभव केला. या विजयाबरोबर बियांका सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली. यापूर्वी २००६ मध्ये रशियाची मारिया शारापोव्हा हिने ग्रँडस्लॅम जिंकले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details