महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 8, 2019, 5:04 PM IST

ETV Bharat / sports

रॉजर फेडररने ३ वर्षानंतर क्ले कोर्टवर ठेवले विजयी पाऊल

कारकिर्दीच्या अखेरच्या टप्यात असलेल्या ३७ वर्षीय रॉजर फेडररने क्ले कोर्टवर शेवटचा सामना २०१६ मध्ये रोम मास्टर्समध्ये खेळला होता. त्यानंतर तो सतत ग्रिन कोर्ट आणि हार्ड कोर्टवर खेळत आहे.

रॉजर फेडरर

स्पेन (माद्रीद) -३७ वर्षीय महान टेनिसपटू रॉजर फेडररने ३ वर्षानंतर क्ले कोर्टवर विजयी पुनरागमन केले आहे. फेडररने माद्रिद ओपन स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात रिचर्ड गेस्टिकचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत सुरुवात केली आहे.

रॉजर फेडरर


फेडररने ५२ मिनीटे चाललेल्या या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला विजयाची कोणतीच संधी न देता दोन्ही सेटमध्ये आपले वर्चस्व गाजवले. सामना जिंकल्यानंतर फेडरर म्हणाला, 'माद्रिद ओपन स्पर्धेत क्ले कोर्टवर पुनरागमन करताना खुप आनंद होत असून, सामना सुरु होण्यापूर्वी आणि सामना झाल्यानंतर प्रेक्षकांचा उत्साह पाहून मी भारावून गेलो होतो.'

ABOUT THE AUTHOR

...view details