माद्रिद- जागतिक क्रमवारीत दुसऱ्यास्थानी असलेली जपानची स्टार खेळाडू नाओमी ओसाकाला माद्रिदओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला. दुसऱ्या फेरीत ओसाकाचा चेक गणराज्यच्या कॅरोलिना मुचोवा हिने पराभव केला.
कॅरोलिना मुचोवाने या हंगामात याआधी क्रमवारीत टॉप-५ मध्ये सहभागी असलेल्या तीन खेळाडूंचा पराभव केला आहे. तिने माद्रिदओपनच्या दुसऱ्या फेरीत एक तास ४९ मिनिटे रंगलेल्या सामन्यात नाओमीचा ६-४, ३-६, ६-१ धुव्वा उडवला.