महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2019, 10:29 PM IST

Updated : Sep 30, 2019, 11:37 PM IST

ETV Bharat / sports

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप : अनु राणीने फेकलेला भाला राष्ट्रीय विक्रम नोंदवत 'फायनल'ला पोहोचला

२०१४ सालच्या आशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी अनुने आपल्या स्वतःचा ६२.३४ मीटर लांब भाला फेकण्याचा रेकॉर्ड मागे टाकत आपल्या सर्वोत्तम कागिरीची नोंद केली.

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप : अनु राणीने भालाफेकमध्ये रचला नवा राष्ट्रीय विक्रम

दोहा (कतार)- येथे सुरू असलेल्या विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय महिला भालाफेकपटू अनु राणीने एक नविन राष्ट्रीय विक्रम नोंदविला. अनुने सोमवारी या स्पर्धेत ६२.४३ मीटर लांब भाला फेकत स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.


२०१४ सालच्या अशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी अनुने आपल्या स्वतःचा ६२.३४ मीटर लांब भाला फेकण्याचा रेकॉर्ड मागे टाकत आपल्या सर्वोत्तम कागिरीची नोंद केली.

अनु राणी भाला फेकताना...

हेही वाचा -जमैकाच्या सुपर मॉमने रचला इतिहास; बोल्टसह अनेक दिग्गजांचा मोडला विक्रम

याचवर्षी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या अशियायी स्पर्धेत अनुने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, त्याला विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकता आलेले नाही. मात्र, यंदा ती अंतिम फेरीत पोहोचल्याने, भारतीयाच्या आशा वाढल्या आहेत.

आज (सोमवार) तिने या स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात ५७.०५ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ६२.४३ मीटर तर तिसऱ्या प्रयत्नात ६०.५० मीटर लांब भाला फेकला आणि पात्रता यादीत ५ वे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा -उसेन बोल्टचा रेकॉर्ड १० महिन्यांपूर्वी आई बनलेल्या एलिसन फेलिक्सने मोडला

Last Updated : Sep 30, 2019, 11:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details