महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 6, 2019, 2:14 PM IST

ETV Bharat / sports

'ठोक दिया ठीक किया',  हैदराबाद एन्काऊंटरनंतर क्रीडापटूंनी व्यक्त केल्या भावना

सायनाने या एन्काऊंटरप्रकरणी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले आहे. 'ग्रेट वर्क हैदराबाद पोलीस. आम्ही तुम्हाला सलाम करतो', असे ट्विट सायनाने केले आहे. तर, 'ठोक दिया ठीक किया', असे बबिता फोगाटने ट्विट करून म्हटले आहे. हैदराबाद येथे 27 नोव्हेंबरला महिला डॉक्टरवर बलात्कारनंतर हत्या करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले

saina, babita, harbhajan reactions after hyderabad encounter
'ठोक दिया ठीक किया',  हैदराबाद एन्काऊंटरनंतर क्रीडापटूंनी व्यक्त केल्या भावना

हैदराबाद -हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातून हैदराबाद पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेते, कलाकार यांच्याबरोबरच खेळाडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, महिला कुस्तीपटू बबीता फोगाट, कुस्तीपटू गीता फोगाट, योगेश्वर दत्त, क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही या प्रकरणी ट्विट केले आहेत.

हेही वाचा -दिल्ली कॅपिटल्समध्ये गौतम गंभीर करू शकतो पुनरागमन...

सायनाने या एन्काऊंटरप्रकरणी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले आहे. 'ग्रेट वर्क हैदराबाद पोलीस. आम्ही तुम्हाला सलाम करतो', असे ट्विट सायनाने केले आहे. तर, 'ठोक दिया ठीक किया', असे बबिता फोगाटने ट्विट करून म्हटले आहे. हैदराबाद येथे 27 नोव्हेंबरला महिला डॉक्टरवर बलात्कारनंतर हत्या करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले.

क्रीडापटूंनी केलेले ट्विट्स -

आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली. पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालणार होता.

कशी घडली होती घटना -

बुधवारी रात्री रुग्णालयातून घरी जात असताना महिलेच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. तेव्हा चार आरोपींनी महिलेवर बलात्कार करून त्यांचा खून केला होता. तसेच त्यांचा मृतदेह जाळला होता. शेवटी महिलेचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सायंकाळी बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details