महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 1, 2020, 3:58 PM IST

ETV Bharat / sports

'निकोला क्युरी'...जगातील सर्वात श्रीमंत घोडा-शर्यतीत भाग घेणारी पहिला महिला 'जॉकी'

'द सौदी कप' नावाच्या या स्पर्धेची बक्षीस रक्कम दोन कोटी डॉलर म्हणजे जवळपास १४३ कोटी ठेवण्यात आली होती. त्यापैकी विजेत्या खेळाडूला ७२ कोटी तर, उपविजेत्या खेळाडूला २५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे.

Nicola Currie will be the first female racer to participate in the world's richest horse race
'निकोला क्युरी'...जगातील सर्वात श्रीमंत घोडा-शर्यतीत भाग घेणारी पहिला महिला 'जॉकी'

रियाध -सौदी अरेबियामध्ये २९ फेब्रुवारीला जगातील सर्वात श्रीमंत घोड्यांची शर्यत घेण्यात आली. सात आंतरराष्ट्रीय महिला जॉकीपैकी एक असलेली निकोला क्युरी या शर्यतीत भाग घेणारी पहिली महिला जॉकी ठरली आहे. या स्पर्धेच्या बक्षीसाची रक्कम थक्क करणारी आहे.

हेही वाचा -VIDEO : What a catch! ...जडेजाच्या झेलमुळे क्रीडाविश्व अचंबित

'द सौदी कप' नावाच्या या स्पर्धेची बक्षीस रक्कम दोन कोटी डॉलर म्हणजे जवळपास १४३ कोटी ठेवण्यात आली होती. त्यापैकी विजेत्या खेळाडूला ७२ कोटी तर, उपविजेत्या खेळाडूला २५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, दहाव्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूलाही मोठी रक्कम मिळाली आहे.

येथील अब्दुल अझीझ रेस ट्रॅकवर १८०० मीटर लांबीची मुख्य शर्यत घेण्यात आली असून ही स्पर्धा पाहण्यासाठी तब्बल १० हजार लोकांनी उपस्थिती नोंदवल्याचे सांगण्यात आले आहे.

अब्दुल अझीझ रेस ट्रॅक

ABOUT THE AUTHOR

...view details