महाराष्ट्र

maharashtra

IPL २०२१ चे उर्वरित सामने कोठे आणि कधी होणार?, जाणून घ्या

By

Published : May 5, 2021, 7:32 PM IST

आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं की, आयपीएल जिथून स्थगित करण्यात आला होता, त्यापासूनच पुढील सामने होतील. वेळेचे नियोजन पाहता, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेआधी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच याचे आयोजन भारतात करण्यात येईल.

ipl 2021 remaining matches to be played in india
IPL २०२१ चे उर्वरित सामने कोठे आणि कधी होणार?, जाणून घ्या

मुंबई - आयपीएलचा चौदावा हंगाम अचानक स्थगित करण्यात आल्यानंतर आता पुढे काय होणार? या प्रश्नावर सद्या सातत्याने चर्चा होत आहे. या दरम्यान, आयपीएल टी-२० विश्वकरंडक आधी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

एका रिपोर्टनुसार, आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं की, आयपीएल जिथून स्थगित करण्यात आला होता, त्यापासूनच पुढील सामने होतील. वेळेचे नियोजन पाहता, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेआधी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच याचे आयोजन भारतात करण्यात येईल.

दरम्यान, देशात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि खेळाडूंनी झालेली कोरोनाची लागण यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलमध्ये कोरोनाग्रस्ताचा आकडा पोहोचला १३ वर -

आयपीएलमध्ये अमित मिश्रा, रिद्धिमान साहा, वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात माईक हसीच्या नावाची भर पडली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत आयपीएलशी संबधित १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेपटूचे अपहरण, बंदुकीचा धाक दाखवत केली मारहाण

हेही वाचा -ICC Test Rankings मध्ये ऋषभ पंतने रचला इतिहास; केला धोनीसारख्या दिग्गजांना न जमलेला कारनामा

ABOUT THE AUTHOR

...view details