महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Exclusive : 2023 मध्ये महिला आयपीएल सुरु होणे अशक्य - बीसीसीआयच्या अधिकाऱ्याची माहिती

ईटीव्ही भारतला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली की, महिलांच्या आयपीएलवर भारतात काळ्या ढगांचे संकट आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्तेचा अभाव आहे, त्यामुळे आयपीएल सुरू होणे शक्य नसल्याचे बोर्डाचे ( Women IPL Impossible ) मत आहे.

By

Published : Apr 12, 2022, 8:57 PM IST

Women IPL
Women IPL

कोलकाता:जगभरातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून आयपीएल स्पर्धेला ओळखले जाते. कारण आयपीएलसारखी लोकप्रियता जगातील कोणत्याच लीगला मिळू शकलेली नाही. तसेच आयपीएलच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) यांनी 2023 मध्ये महिला आयपीएल ( Women's IPL ) लीग सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना वाटत आहे की, महिला क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्तेचा अभाव आहे, त्यामुळे देशात महिलांसाठी आयपीएल सुरू होणे शक्य ( Women IPL Impossible ) नाही.

याबाबत गुप्तता राखत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतला सांगितले की, बीसीसीआय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मात्र महिला क्रिकेटपटूंमध्ये टॅलेंटची गंभीर कमतरता आहे. त्यामुळे यावेळी महिला लीग सुरू होणे अशक्य वाटत आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आयपीएलसारखी लीग सुरू करण्यासाठी किमान 4-5 संघ आवश्यक आहेत. अशा स्थितीत खेळाडूंची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार संघ बनवणे शक्य नाही. पुरुष क्रिकेटपटूंच्या बरोबरीला येण्यासाठी महिलांना खूप मेहनत करावी लागणार आहे.

पुरुष क्रिकेटच्या प्रतिभेवर प्रकाश टाकताना अधिकाऱ्याने सांगितले की, "महिला क्रिकेटने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकही खेळाडू तयार केलेला नाही. जर पुरूष संघावर नजर टाकली, तर त्यात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र महिला क्रिकेटमध्ये पुरेशा दर्जेदार खेळाडू नाहीत.

उदाहरण देताना ते म्हणाले, महिला क्रिकेट संघात झुलन गोस्वामीसारख्या ( Jhulan Goswami ) दर्जाची खेळाडू नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे झुलनची कारकीर्दही जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने 16 मार्च रोजी भारताच्या आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी पहिली महिला वेगवान गोलंदाज बनून इतिहास रचला होता. झुलनने इंग्लंडची सलामीवीर टॅमी ब्युमॉंटला बाद करताना ही कामगिरी केली.

हेही वाचा -Ipl 2022 Csk Vs Rcb : नाणेफेक जिंकून आरसीबीचा गोलंदाजीचा निर्णय; सीएसकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण

ABOUT THE AUTHOR

...view details