मँचेस्टर -आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाने हजेरी लावली. सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या होत्या. तेव्हा पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे आज खेळ होऊ शकला नाही. यामुळे उद्या बुधवारी म्हणजे राखीव दिवशी उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे.
INDvsNZ LIVE : आजच्या खेळावर पावसाने फेरले 'पाणी'; उर्वरित सामना राखीव दिवशी - ind vs nz
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना रंगला होता. मात्र या सामन्यात पावसाने हजेरी लावली त्यामुळे उर्वरित सामना उद्या बुधवारी होणार आहे.

INDvsNZ LIVE :न्यूझीलंड - भारत सामन्यात पावसाचा व्यत्यय.. खेळ थांबला
LIVE UPDATE :
- उर्वरित सामना उद्या बुधवारी खेळवण्यात येणार आहे
- पावसाला सुरुवात
- न्यूझीलंड 46.1 षटकात 211 धावा
- पावसाने सामन्यात व्यत्यय
- न्यूझीलंड अर्धा संघ माघारी, डी ग्रँडहोमे बाद
- रॉस टेलरचे अर्धशतक
- न्यूझीलंडला चौथा धक्का; हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर जिमी निशामचा कार्तिकने घेतला झेल
- न्यूझीलंड 36 षटकात 3 बाद 136 धावा
- चहलच्या गोलंदाजीवर जडेजाने घेतला झेल
- कर्णधार केन विल्यमसन 67 धावांवर बाद
- न्यूझीलंड 31 षटकात 2 बाद 120 धावा
- कर्णधार केन विल्यमसनचे अर्धशतक पूर्ण
- न्यूझीलंड 20 षटकात 2 बाद 73 धावा
- रॉस टेलर मैदानात
- युजवेंद्र चहलने काढला निकोलसचा त्रिफाळा
- न्यूझीलंडला दुसरा धक्का; हेन्री निकोलस बाद
- न्यूझीलंड 15 षटकात 1 बाद 55 धावा
- भारतीय गोलंदाजांनी घातले न्यूझीलंडच्या फलंदाजाना वेसन
- बुमराने धाडले गुप्टीलला माघारी, गुप्टील 1 धाव करुन बाद
- नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय
दोन्ही संघांची Playing XI -
- भारत -विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा.
- न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर.
Last Updated : Jul 9, 2019, 11:07 PM IST