महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राजस्थानची साथ सोडून स्टिव्ह स्मिथ मायदेशी

यावर्षी आयपीएलमध्ये स्मिथने १० सामने खेळताना ३ अर्धशतकांसह ३९.८८ च्या सरासरीने ३१९ धावा केल्या.

स्टिव्ह स्मिथ

By

Published : May 2, 2019, 5:18 PM IST

बंगळुरू -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ३० एप्रिलला खेळण्यात आलेला सामना हा राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथचा आयपीएलच्या बाराव्या सत्रातील शेवटचा सामना ठरला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आला आणि दोन्ही संघाना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला होता.


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात स्टिव्ह स्मिथची निवड झाल्याने त्याला मोक्याच्या क्षणी राजस्थानची साथ सोडून मायदेशी परतावे लागले. अखेरच्या सामन्यानंतर स्मिथने मायदेशी परतताना आनंद व्यक्त करत राजस्थान संघाचा भावनिक निरोप घेतला. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये १० सामने खेळताना ३ अर्धशतकांसह ३९.८८ च्या सरासरीने ३१९ धावा केल्या.

स्मिथने ट्विटरवरून एक पोस्ट शेयर करत राजस्थान संघाचे आभार मानले आहेत. यात तो म्हणाला की, आयपीएलमधील गेल्या ७ आठवड्यांसाठी मी राजस्थानाचे आभार मानत असून, या काळाच प्रत्येक मिनीटाची मी मजा घेतलीय. तसेच त्याने पुढील दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी राजस्थानला शुभेच्छाही दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details