महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'आता आम्ही, आमचे क्रिकेट किट जाळून, नोकरीसाठी अर्ज करावा का?'

आयसीसीच्या निलंबनाच्या निर्णयावर झिम्बाब्वे अष्टपैलू खेळाडू सिंकदर रझाने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, त्या निर्णयामुळे आमचे करिअर संपले. आता आम्हाला फक्त क्लब क्रिकेटमध्ये खेळावे लागणार आहे बहुतेक, हाच शेवटचा पर्यांय असेल. याशिवाय क्रिकेट खेळू शकणार नाही. आता आम्ही आमचे क्रिकेट किट जाळून नोकरीसाठी अर्ज करावा का? मला सद्य स्थितीत काही उमजत नसल्याचे सांगत रझाने आपला संताप व्यक्त केला.

'आता आम्ही, आमचे क्रिकेट किट जाळून, नोकरीसाठी अर्ज करावा का?'

By

Published : Jul 20, 2019, 7:09 PM IST

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आचारसंहितेचा भंग केल्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेटवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. या कठोर निर्णयामुळे झिम्बाब्वे खेळांडूमध्ये नैराश्य आले असून खेळाडूंनी आयसीसीच्या निलंबनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आयसीसीच्या निलंबनाच्या निर्णयावर झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिंकदर रझाने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, त्या निर्णयामुळे आमचे करिअर संपले. आता आम्हाला फक्त क्लब क्रिकेटमध्ये खेळावे लागणार आहे बहुतेक, हाच शेवटचा पर्यांय असेल. याशिवाय क्रिकेट खेळू शकणार नाही. आता आम्ही आमचे क्रिकेट किट जाळून नोकरीसाठी अर्ज करावा का? असा सवाल त्याने विचारत मला सद्य स्थितीत काही उमजत नसल्याचे सांगितलं.

आयसीसीच्या एका निर्णयाने आमच्या संघाला पोरकं केलं आणि त्या निर्णयाने कित्येक लोकांचा रोजगार गेला. अनेकांची करिअर संपली. मला अशा पद्धतीने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा नव्हती, असे रझा म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details