महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2020, 4:04 PM IST

ETV Bharat / sports

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!.. आयपीएलनंतर १४ दिवसांत सुरू होणार नवी टी-२० लीग

लंका प्रीमियर लीगमध्ये पाच फ्रेंचायझी सहभागी होतील. प्रत्येक फ्रेंचायझीमध्ये एकूण १९ खेळाडू असतील, ज्यात सहा परदेशी आणि श्रीलंकेचे १३ खेळाडू असतील. ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

Lanka premier league will now start from november 21
क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!..आयपीएलनंतर १४ दिवसात सुरू होणार नवी टी-२० लीग

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) लंका प्रीमियर लीग (एलपीएल) टी -२० स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ही लीग आता २१ नोव्हेंबरपासून सुरू होईल. १४ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार होती. यात सहभागी झालेल्या खेळाडूंना अलग ठेवण्यासाठी वेळ मिळावा आणि इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सत्रात खेळणार्‍या खेळाडूंनाही यात खेळण्याची संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

"आयपीएलची सांगता १० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे जे खेळाडू एलपीएलमध्ये खेळू इच्छित आहेत त्यांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे'', असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले. एलपीएल स्पर्धेतील खेळाडूंचा ड्राफ्ट १ ऑक्टोबरला होणार होता. मात्र, हा कार्यक्रम आता ९ ऑक्टोबरला होईल.

या स्पर्धेत पाच फ्रेंचायझी सहभागी होतील. प्रत्येक फ्रेंचायझीमध्ये एकूण १९ खेळाडू असतील, ज्यात सहा परदेशी आणि श्रीलंकेचे १३ खेळाडू असतील. ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. २३ सामन्यांची एलपीएल लीग डम्बुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पाल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सूरीयावेवा महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details