महाराष्ट्र

maharashtra

'ठरलं तर', या सत्रात बंगळुरूसाठी 'स्टेन’गन धडाडणार

By

Published : Apr 13, 2019, 1:24 PM IST

प्लेऑफमध्ये पोहचायचे असल्यास आरसीबीला उरलेले सर्वच्या सर्व सामने त्यांना जिंकावे लागणार आहेत

डेल स्टेन

बंगळुरू - आयपीएलच्या बाराव्या सत्रात आतापर्यंत सर्वाधिक अयशस्वी ठरलेला संघ म्हणजे, विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. यंदा आतापर्यंत बंगळुरूने खेळलेल्या ६ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे विराटचा संघ शून्य गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे.

डेल स्टेनची जर्सी


आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचायचे असल्यास उरलेले सर्वच्या सर्व सामने त्यांना जिंकावे लागणार आहेत. चारही बाजूनी संकटात सापडलेल्या आरसीबीला तारण्यासाठी एक आशेचा किरण दिसला आहे. तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन.


काही दिवसांपूर्वी बंगळुरूच्या संघात डेल स्टेनचे पुनरागमन होणार, अशी चर्चा होत होती. यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आज शिक्कामोर्तब केले आहे. बंगळुरू संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अंकाऊटवर डेल स्टेनच्या नव्या जर्सीचं अनावरण केले आहे. यावरुन आरसीबीसाठी 'स्टेन’गन मैदानात धडाडणार हे स्पष्ट झाले आहे.


बंगळुरूचा संघ आज मोहालीच्या मैदानवार पंजाबशी भिडणार आहे. याच सामन्यात स्टेन खेळण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलमध्ये २००८ ते २०१० दरम्यान स्टेन आरसीबी संघासाठी खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये ९० सामने खेळताना ९१ गडी बाद केले आहेत. डेल स्टेनला नॅथन काल्टर नाईलचा बदली खेळाडू म्हणून बंगळुरूच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details