महाराष्ट्र

maharashtra

अनस्टॉपेबल!..सात्विक-चिरागने गाठली चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी

By

Published : Nov 8, 2019, 2:04 PM IST

उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना ४३ मिनिटे रंगला होता. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये जोरदार लढत झाली. सुरूवातीला भारतीय खेळाडूंनी १३-१० अशी आघाडी घेतली होती. मात्र, ली जून हू आणि लिऊ यू चेन यांनी पुनरागमन केले. या गेमच्या अंतिम क्षणी मात्र, सात्विक आणि चिरागने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्येही कामगिरीत सातत्य राखत सात्विक आणि चिरागने हा गेम आपल्या नावावर केला.

अनस्टॉपेबल!..सात्विक-चिरागने गाठली चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी

चीन -भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने आपला दबदबा कायम ठेवत चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या ली जून हू आणि लिऊ यू चेन यांना सरळ गेममध्ये २१-१९, २१-१५ असे पराभूत केले.

हेही वाचा -अजिंक्य रहाणेच्या मुलीचं झालं बारसं, नाव आहे.....

उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना ४३ मिनिटे रंगला होता. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये जोरदार लढत झाली. सुरूवातीला भारतीय खेळाडूंनी १३-१० अशी आघाडी घेतली होती. मात्र, ली जून हू आणि लिऊ यू चेन यांनी पुनरागमन केले. या गेमच्या अंतिम क्षणी मात्र, सात्विक आणि चिरागने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्येही कामगिरीत सातत्य राखत सात्विक आणि चिरागने हा गेम आपल्या नावावर केला.

नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पराभव झाला होता. अंतिम सामन्यात या जोडीला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या केविन सुकामुलजो आणि मार्कस फर्नाल्डी या जोडीने हरवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details