महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 5, 2020, 7:18 PM IST

ETV Bharat / sitara

पुरुषाची भूमिका करण्याचा आयुष्यात कधीही विचार केला नव्हता - अदा शर्मा

अभिनेत्री अदा शर्मा हिने ‘मॅन टू मॅन’ या नव्या चित्रपटात एका पुरुषाची भूमिका साकारली आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. अशी भूमिका साकारण्याचा आयुष्यात कधी विचारही केला नव्हता असे अदाने म्हटले आहे.

Ada Sharma
अदा शर्मा

मुंबई - अभिनेत्री अदा शर्माने तिच्या ‘मॅन टू मॅन’ या नव्या चित्रपटात एका पुरुषाची भूमिका साकारली आहे. ती म्हणते की तिने कधीच आयुष्यात माणसाची भूमिका साकारेल असा विचारही केला नव्हता.

अदाने वत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी आहे. एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो आणि मग त्याला कळले की ती मुलगी नाही तर पुरुष आहे. मी एका माणसाची व्यक्तिरेखा साकारत आहे. ही खूप गोड प्रेमकहाणी आहे, पण त्यात एक ट्विस्ट आहे. मी चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल. मी तुम्हाला खात्री देते की यापूर्वी तुम्ही असे काही पाहिलेले नसेल. हे खूप छान आहे.''

हेही वाचा - 'मेडे'मध्ये अमिताभ, अजय देवगणसोबत झळकणार अंगिरा धर

ती पुढे म्हणाली, "मला असं वाटले नव्हते की मी माणसाची भूमिका साकारेल. चित्रपटातील माझे पात्र महिला बनण्यासाठी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करते आणि मला विश्वास आहे की ट्रान्स जेंडर समुदायाला आम्ही न्याय देऊ शकू. ''

ते म्हणाले, "मी स्वतःला भाग्यवान समजते की दिग्दर्शकाने माझा विचार केला, त्यांनी जोखीम असणारा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मी नेहमी अशी भूमिका निवडण्याच्या प्रयत्नात असते की ती भूमिका माझ्या आधीच्या भूमिकासारखी नसेल."

हेही वाचा - अक्षय कुमार 'रामसेतु'चे आयोध्येत करणार शुटिंग

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबद्दल आपल्याला काळजी वाटत आहे का असे विचारले असता, अदा म्हणाली, "प्रेक्षक काय विचार करतील याची मला भीती वाटत नाही कारण प्रेक्षकांनी नेहमीच मला मोठा पाठिंबा दर्शविला आहे. '1920' या चित्रपटात माझे दात काळे होते आणि मी खूपच भितीदायक दिसत होते. 'कमांडो 2' मध्ये मला तेलगू भाषेत हिंदी बोलायचे होते. प्रत्येक वेळी प्रेक्षकांनी मला मनापासून स्वीकारले आहे."

'मॅन टू मॅन' या चित्रपटाची कथा अबीर सेनगुप्ता यांनी लिहिली आहे आणि दिग्दर्शनही केले आहे आणि या चित्रपटात नवीन कस्तुरिया देखील आहे. या चित्रपटाशिवाय अदा शर्मा आगामी 'कमांडो -4' आणि वेब सीरिज 'द हॉलिडे' च्या दुसर्‍या सीझनमध्ये दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details