महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कबड्डीच्या खेळावर आधारित 'सूर सपाटा' सिनेमाचा ट्रेलर लाँच

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, आभिज्ञा भावे, नेहा शितोळे, संजय जाधव यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. संजय जाधव हे पहिल्यादा नकारात्मक भूमिका साकारत आहेत. त्यांच्याशिवाय ७ नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील.

By

Published : Feb 28, 2019, 9:26 AM IST

ट्रेलरमधील एक क्षण

मुंबई- कबड्डीच्या खेळावर आधारित असणाऱ्या 'सूर सपाटा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी या सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. मातीतल्या खेळावर आधारित हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होतोय.

लाडे ब्रदर्स निर्मित आणि दिग्दर्शक मंगेश कंठाळे दिग्दर्शित ''सूर सपाटा'ही एका शाळेतील विद्यार्थ्यांची कथा आहे. कबड्डीत हुशार पण अभ्यासात 'ढ' असलेल्या या मुलांनी एक आंतरशालेय कबड्डी स्पर्धा मोठ्या जिद्दीने जिंकण्याची ही गोष्ट आहे.

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, आभिज्ञा भावे, नेहा शितोळे, संजय जाधव यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. संजय जाधव हे पहिल्यादा नकारात्मक भूमिका साकारत आहेत. त्यांच्याशिवाय ७ नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील.

कबड्डीचा खेळ नक्की आयुष्यात कसा बदल घडवतो आणि आयुष्याला कशी नवी दिशा देतो ते या सिनेमात पाहायला मिळणार आहे. चित्रपट २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यामुळे मातीतल्या खेळाची जिद्दी कहाणी पाहण्याआधी या सिनेमाचा ट्रेलर नक्की पाहा.

ABOUT THE AUTHOR

...view details