महाराष्ट्र

maharashtra

अली फजलच्या आईचे निधन, अलीने ट्विटरवर दिली माहिती

By

Published : Jun 18, 2020, 2:56 PM IST

बॉलिवूड अभिनेता अली फजल याच्या आईचे लखनौमध्ये निधन झाले आहे. अलीने आपल्या ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे. यासोबत त्याने आपल्या आईचा फोटोही शेअर केल आहे.

Ali Fazal's mother death
अली फजलच्या आईचे निधन

मुंबई - अभिनेता अली फजलच्या आईचे बुधवारी लखनौमध्ये निधन झाले. अलीने आईचा फोटो शेअर करुन ही माहिती चाहत्यांना कळवली आहे.

अलीने ट्विटरवर लिहिलंय, माझे उर्वरित आयुष्य मी आईसाठी जगेन. ''मिस यू अम्मा...यहीं तक था हमारा..पता नहीं क्यूं. माझ्या सृजनतेची तू स्त्रोत होतीस..माझे सर्व काही..माझी प्रत्येक गोष्ट...आगे अल्फाज नहीं रहे. प्रेम, अली."

अली फजलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ''अलीच्या आईचे लखनौमध्ये आजारपणामुळे निधन झाले. त्यांचे अचानक निधन झाले. आम्ही प्रार्थना करीत आहोत. या कठिण प्रसंगात प्रशंसकांनी प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल अली फजल आपला आभारी आहे.''

ABOUT THE AUTHOR

...view details