महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 8, 2020, 3:48 PM IST

ETV Bharat / sitara

सुपरस्टार यशने पुन्हा एकदा सुरू केले 'केजीएफ 2'चे शूटिंग

'केजीएफ 2' शूटिंगला सुपरस्टार यशने सुरुवात केली आहे. एक फोटो शेअर करीत त्याने ही बातमी चाहत्यांना दिली. 'केजीएफ 2' हा वर्ष २०२० मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये यश पुन्हा रॉकी भाईच्या भूमिकेत दिसणार आहे.

shooting for 'KGF 2'
'केजीएफ 2'चे शूटिंग

मुंबई - २०१८मध्ये रिलीज झालेला सुपरस्टार यशचा 'केजीएफ' हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता आणि त्याच्या रॉकी या पात्राने देशभर दहशत निर्माण केली होती. चित्रपटाच्या सीक्वलच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली आहे.

यश गेल्या काही दिवसांपासून सेटवर पुनरागमन करण्यासाठी जोरदार उत्सुक होता.आज पहाटे यशने एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याच्या चाहत्यांना शूटिंग पुन्हा सुरू झाल्याच्या बातमी दिली आहे.

फोटो शेअर करीत यशने लिहिलंय, ''लाटा रोखता येत नाहीत पण तुम्ही पोहोयला शिकू शकता. एक दीर्घ विश्रांतीनंतर रॉकीने पुन्हा एकदा पोहोयला सुरू केले.''

'केजीएफ 2' हा वर्ष २०२० मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये यश पुन्हा रॉकी भाईच्या भूमिकेत दिसणार आहे. यश व्यतीरिक्त अभिनेता संजय दत्त आणि श्रीनीधी शेट्टी यांची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details