महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 13, 2021, 1:24 PM IST

ETV Bharat / sitara

सोनू सूद सवयीचा अपराधी, बीएमसीचा उच्च न्यायालयात आरोप

या इमारतीत सुरू असलेल्या कामाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेकडून सप्टेंबर 2018 मध्ये कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ही सोनू सूद याने सदरचे अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेने केला आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये मुंबई महानगरपालिकेकडून शक्ती सागर या इमारतीत सुरू असलेले अनधिकृत बांधकाम सुद्धा पाडण्यात आले होते.

सोनू सूद अनधिकृत बांधकाम न्यूज
सोनू सूद अनधिकृत बांधकाम न्यूज

मुंबई - हिंदी चित्रपट अभिनेता सोनू सूद याच्या मुंबईतील सहा मजली इमारतीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. यानंतर यासंदर्भात कारवाई केली जात असताना अभिनेता सोनू सूद याने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अभिनेता सोनू सूद हा सवयीचा अपराधी म्हणजेच हॅबिच्युअल ऑफेंडर असल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेला आहे.

हेही वाचा -...तर मंत्री बच्चू कडू, तहसीलदार आणि ठाणेदारावर खुनाचा गुन्हा दाखल करा


याअगोदरही झाली आहे कारवाई

या इमारतीत सुरू असलेल्या कामाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेकडून सप्टेंबर 2018 मध्ये कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ही सोनू सूद याने सदरचे अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेने केला आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये मुंबई महानगरपालिकेकडून शक्ती सागर या इमारतीत सुरू असलेले अनधिकृत बांधकाम सुद्धा पाडण्यात आले होते.

सोनू सूद हा सवयीचा गुन्हेगार

सोनू सूद याच्या शक्ती सागर या 6 मजली रहिवासी इमारतीमध्ये अनधिकृत बदल करून त्याचा वापर हा व्यवसायिक गोष्टींसाठी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात कारवाई केली होती. शक्ती सागर या रहिवासी इमारतीचे रूपांतरण हॉटेलमध्ये करत असताना सोनू सूद याने मुंबई महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती किंवा त्या प्रकारचे हॉटेल चालवण्याचा परवानासुद्धा सोनूकडे नसल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महानगरपालिकेने केला आहे.

हेही वाचा -'मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप'

ABOUT THE AUTHOR

...view details