महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 31, 2020, 1:44 PM IST

ETV Bharat / sitara

कानिका कपूरची पाचवी टेस्टही पॉझिटिव्ह

20 मार्चला कनिका कपूरला कोरोनाचे निदान झाले होते. ती लंडन वरून भारतात परतल्यानंतर तिला काही दिवसानंतर कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती.

Singer Kaika Kapoor tested COVID 19 Positive for fifth time
कानिका कपूरची पाचवी टेस्टही पॉझिटिव्ह

मुंबई - बेबी डॉल फेम गायिका कानिका कपूर सध्या कोरो ना वर उपचार घेत आहे. तिची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कळविश्वात एकच खळबळ उडाली होती. बॉलिवूड मध्ये कोरोनग्रस्त असलेली ती पहिली सेलिब्रिटी ठरली. त्यानंतर तिच्या आणखी 4 टेस्ट करण्यात आल्या. मात्र त्या देखील पॉझिटिव्ह निघाल्या. आता तिची पाचवी टेस्ट देखील पॉझिटिव्ह निघाली आहे.


20 मार्चला कनिका कपूरला कोरोनाचे निदान झाले होते. ती लंडन वरून भारतात परतल्यानंतर तिला काही दिवसानंतर कोरोनाची लक्षणं दिसू लागली. तिचा रिपोर्ट पझिटिव्ह आल्यानंतर तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिच्या कुटुंबियांनी तिच्या रिपोर्ट वर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे तिची पुन्हा एकदा टेस्ट करण्यात आली होती. दुसरा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या उपचारात आणखी वाढ करण्यात आली.

सध्या तिच्यावर संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या उपचाराबाबत ती सोशल मीडिया वरून उपडेट्स शेअर करत असते. तिच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा आहेत. तिला आयसीयूमधे दाखल करण्यात आलेले नाही. यापुढची टेस्ट तरी पॉझिटिव्ह यावी अशी, इच्छा तिने व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details