महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 14, 2019, 2:02 PM IST

ETV Bharat / sitara

दुसऱ्या दिवशी 'सुपर ३०'च्या कमाईत वाढ, जाणून घ्या आकडे

या विकेंडला 'सुपर ३०' चित्रपट अर्धशतक म्हणजेच ५० कोटींचा गल्ला पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे. कारण रविवारी चित्रपटाच्या कमाईचे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

'सुपर ३०'च्या कमाईत वाढ

मुंबई- गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनने मुख्य भूमिका साकारली आहे. हृतिकच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

पहिल्या दिवशी चित्रपटाने ११.८३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी कमाईच्या आकड्यात वाढ झाली आहे. शनिवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला झाला असून दुसऱ्या दिवशी या सिनेमाने १८.१९ कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसातच चित्रपटानं ३० कोटींचा आकडा पार केला आहे.

या विकेंडला 'सुपर ३०' चित्रपट अर्धशतक म्हणजेच ५० कोटींचा गल्ला पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे. कारण रविवारी चित्रपटाच्या कमाईचे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता हृतकिचा हा चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details