महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 12, 2019, 12:14 PM IST

ETV Bharat / sitara

सैफ अलीने हातावर काढला टॅटू, करिनासोबतचा फोटो व्हायरल

सैफ अली खानने हातावर टॅटू बनवला आहे. हा टॅटू वेगळा असला तरी सैफच्या व्यक्तीमत्वाला शोभून दिसत आहे. सोशल मीडियावर याला पसंती मिळताना दिसत आहे.

सैफ अली खान

मुंबई - अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान सध्या लंडनमध्ये आहेत. इथे ते आपले काम आणि सुट्टीचा आनंद लुटत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोतील सैफच्या हातावर असलेले गोंदण चर्चेचा विषय ठरला आहे.

सैफ अली खानने हातावर टॅटू बनवला आहे. फोटोत हा टॅटू स्पष्ट दिसतोय. हा टॅटू वेगळा असला तरी सैफच्या व्यक्तीमत्वाला शोभून दिसत आहे. सोशल मीडियावर याला पसंती मिळताना दिसत आहे. फोटोत सैफ कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून करिना कपूर ब्लॅक आऊटफिटमध्ये मेकअप शिवाय दिसत आहे.

करिना आणि सैफमधील केमेस्ट्री खूप छान आहे. दोघेही बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश कपलपैकी एक आहेत. दोघे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते.

कामाच्या पातळीवर सैफ अली खान नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये झळकणार आहे. १५ ऑगस्टला ही वेबसिरीज प्रसारित होईल. याशिवाय नवदिप सिंह यांच्या 'लाल कप्तान' चित्रपटामुळेही सैफ चर्चेत आहे. हा चित्रपट ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. सध्या सैफ अली 'जवानी जानेमन' चित्रपटाचे लंडनमध्ये शूटींग करीत आहे. करिना कपूर आगामी अंग्रेजी मीडियम आणि करण जोहरच्या 'तख्त'मध्ये दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details