महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 5, 2020, 5:36 PM IST

ETV Bharat / sitara

बैरूत ब्लास्टः '२०२० मध्ये अजून किती वाईट घडेल याची कल्पना करू शकत नाही,' बॉलिवूडने व्यक्त केला शोक

मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरूत येथे झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा बळी गेला, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. स्फोटानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या स्फोटात बळी पडलेल्या नागरिकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या हृदय हेलावून टाकणाऱ्या स्फोटात बळी पडलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

BEIRUT-EXPLOSION
बैरूत ब्लास्टः बॉलिवूडने व्यक्त केला शोक

मुंबई - लेबनॉनची राजधानी बैरूत येथे मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटाने जगाला हादरवून टाकले. या स्फोटात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले असून हजारो लोक जखमी झाल्याची नोंद आहे. झालेल्या स्फोटात बळी पडलेल्या नागरिकांबद्दल सोशल मीडियावर संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या हृदय हेलावून टाकणाऱ्या स्फोटात बळी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे.

प्रियंका चोप्राने लिहिले- हे भयावह आहे. धोकादायक. या स्फोटातील प्रत्येक पीडितासाठी माझे प्रेम आणि प्रार्थना.

अभिनेता फरहान अख्तर म्हणाला - जेव्हा आपल्या मनाने, आपल्या डोळ्यांनी जे पाहिले त्यावर विश्वास ठेवावा. बैरूत आणि तिथले लोक माझ्या मनात आहेत.

अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट करून लिहिले आहे - भयानक आणि हृदय विदारक. बैरूतच्या रस्त्यावर कोणत्या वेदना आणि विध्वंस झाला असेल याची कल्पना करू शकत नाही.

गायक हनी सिंहने लिहिले- बैरूतमध्ये जे घडले ते पाहून हृदय थक्क झाले. या स्फोटातील पीडितांविषयी माझ्या संवेदना

भूमी पेडणेकर हिनी लिहिले की, 'हा व्हिडिओ पाहून माझा पाठीचा मणका थरथरला. अत्यंत विध्वंसक. आमच्या संवेदना बैरूतच्या लोकांबद्दल आहेत. आम्ही तुमच्यासाठी हात जोडून प्रार्थना करीत आहोत. २०२० मध्ये अजून किती वाईट घडेल याची कल्पना करू शकत नाही '

सेलिना जेटली, निमरत कौर, आयशा टाकिया, मौनी रॉय यासारख्या सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला आहे.

लेबनानचे पंतप्रधान हसन दिआब यांनी सांगितले की, बंदरात 2750 टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. स्फोट इतका वेगवान होता की संपूर्ण शहरात काचा फुटल्या आहेत आणि लोक सैरा वैरा फिरत आहेत. शहरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. लेबनानच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन आठवड्यांसाठी बैरूतमध्ये आणीबाणी लागू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details