महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 8, 2021, 11:05 PM IST

ETV Bharat / sitara

नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह यांना बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता विवान शहा यांनी ही माहिती दिली. निमोनियाच्या उपचारासाठी मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Naseeruddin Shah
नसीरुद्दीन शाह

मुंबई - निमोनियाच्या उपचारासाठी मुंबईतील रूग्णालयात दाखल झालेल्या ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह यांना बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता विवान शहा यांनी ही माहिती दिली. नसीरुद्दीन शाह यांना गेल्या मंगळवारी खार येथील पीडी हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले होते.

विवान शाहने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वडील आणि आई, अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांचा एक फोटोसह पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आज सकाळी त्यांना डिस्चार्ज मिळाला."

३ जुलै रोजी रुग्णालयाच्या एका सूत्रांनी सांगितले होते की नसीरुद्दीन यांची प्रकृती सुधारत आहे. गेल्या आठवड्यात रत्ना पाठक शाह यांनी वृत्त संस्थेला सांगितले होते की, नसीरुद्दीन यांच्या फुफ्फुसात न्यूमोनिया आहे आणि त्यासाठीच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता नसीरुद्दीन शाह हे समांतर आणि मुख्य प्रवाहातल्या सिनेमांमध्ये आघाडीते कलाकार आहेत. तसेच टीव्ही आणि रंगभूमीवरील अविस्मरणीय कामांसाठी म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये "निशांत", "जाने भी दो यारो", "मिर्च मसाला", "इजाज़त", "मासूम", "कर्मा", "विश्वात्मा", "मोहरा", "सरफरोश" इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)चे ते माजी विद्यार्थी होते.

हेही वाचा - सलमान खानसह ७ जणांवर कथित फसवणूक प्रकरणी समन्स

ABOUT THE AUTHOR

...view details