महाराष्ट्र

maharashtra

कपिल शर्माची धूम स्टाईल, पहाटे ५ वाजता बुलेट राईड

By

Published : Mar 17, 2022, 11:46 AM IST

कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कपिल पहाटे ५ वाजता बुलेट चालवताना दिसत आहे. काही वेळापूर्वीच त्याने हा व्हिडिओ शेअर केला असून चाहतेही या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत.

कपिल शर्मा
कपिल शर्मा

मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा पहाटे रस्त्यावर बुलेटची सफर करतानाचा व्हिडिओ सध्या गाजत आहे. द काश्मीर फाइल्सच्या वादानंतर कपिल शर्माची एक अनोखी स्टाइल पाहायला मिळत आहे. नुकताच कपिलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पहाटे ५ वाजता भुवनेश्वरच्या रसत्यावर बाइक चालवताना दिसत आहे.

कपिल शर्मा टीव्ही जगतातील सुपरस्टार कॉमेडियन आहे. त्याची ख्याती देशविदेशातही आहे. आता सिनेमाकडे पुन्हा वळलाय तोही गंभीर भूमिका आणि दिग्दर्शन करणाऱ्या नंदिता दास यांच्यासोबत. या चित्रपटाच्या शुटिंगच्या निमित्ताने कपिल ओडिसातील भुवनेश्वरला पोहोचला होता. त्यावेळी त्याने पहाटे शहराची हवापालट केली.

नुकताच कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कपिल पहाटे ५ वाजता बुलेट चालवताना दिसत आहे. काही वेळापूर्वीच त्याने हा व्हिडिओ शेअर केला असून चाहतेही या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलंय की, कपिल एवढ्या पहाटे उठेल अशी अपेक्षा नव्हती. तर दुस-या चाहत्याने त्याला बुलेट राजा म्हटलंय.

'कपिल शर्मा - आय एम नॉट डन यट' या नेटफ्लिक्स शोनंतर कपिल शर्माने त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कपिल सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अॅपलॉज एंटरटेनमेंट आणि नंदिता दास इनिशिएटिव्हजच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

या चित्रपटात कपिलने फूड डिलिव्हरी रायडरची भूमिका साकारणार आहे, तर शहाना गोस्वामी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस भुवनेश्वरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

हेही वाचा -महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडी प्रेमकथा, ‘लगन’!

ABOUT THE AUTHOR

...view details