महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 5, 2020, 8:13 AM IST

Updated : Apr 5, 2020, 8:33 AM IST

ETV Bharat / sitara

...अखेर कनिका कपूरची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह

20 मार्चला कनिका कपूरला कोरोनाचे निदान झाले होते.

Finally! Kanika Kapoor tests negative for COVID-19
...अखेर कनिका कपूरची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह

मुंबई - 'बेबी डॉल' फेम गायिका कानिका कपूर सध्या कोरोनावर उपचार घेत आहे. तिची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली होती. बॉलिवूडमध्ये कोरोनग्रस्त असलेली ती पहिली सेलिब्रिटी ठरली. त्यानंतर तिच्या आणखी 5 टेस्ट करण्यात आल्या. मात्र, त्या देखील पॉझिटिव्ह निघाल्या होत्या. आता मात्र, तिची टेस्ट निगेटिव्ह झाली आहे. तरीही आणखी काही दिवस तिला रुग्णालयात उपचार सुरू ठेवावे लागणार आहेत. कानिकाची प्रकृती आता स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

20 मार्चला कनिका कपूरला कोरोनाचे निदान झाले होते. ती लंडनहून भारतात परतल्यानंतर तिला काही दिवसानंतर कोरोनाची लक्षणं दिसू लागली. तिचा रिपोर्ट पझिटिव्ह आल्यानंतर तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तिच्या रिपोर्टवर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे तिची पुन्हा एकदा टेस्ट करण्यात आली होती. दुसरा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या उपचारात आणखी वाढ करण्यात आली. सध्या तिच्यावर संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या उपचाराबाबत ती सोशल मीडियावरून अपडेट्स शेअर करत असते.
Last Updated : Apr 5, 2020, 8:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details