महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 4, 2019, 1:50 PM IST

ETV Bharat / sitara

भारताच्या 'आईनस्टाईन'वर फरहान करणार 'बायोपिक'ची निर्मिती

फरहान अख्तरने भारतीय आईनस्टाईन अशी ओळख असलेल्या वशिष्ठ नारायण सिंग यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे मोठे गणिततज्ञ म्हणून वशिष्ठ यांना मानले जाते.

Farhan Akhtar
फरहान अख्तर


मुंबई - जगप्रसिध्द गणिततज्ञ वशिष्ठ नारायण सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याची घोषणा प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तरने केली आहे. याची बातमी ट्रेड अ‌ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.

तरण आदर्श लिहितात, ''भारतीय गणिततज्ञ वशिष्ठ नारायण सिंग यांच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. याचे दिग्दर्शन नीरज पाठक यांचे असून एक्सल एन्टरटेन्मेंटची ही निर्मिती असेल.''

जगप्रसिध्द गणिततज्ञ वशिष्ठ नारायण सिंग

भारतीय प्रेक्षकांना यामुळे वशिष्ठ नारायण सिंग यांचे चरित्र पाहायला मिळणार आहे. नीरज पाठक यांनी यावर काम सुरू केले असून त्यांनी कथेची जुळणी केली आहे. गेली दोन वर्षे ते यावर काम करीत आहेत. त्यांनी बिहारमधील बसंतपूरमधील खेड्यात जाऊन वशिष्ठ यांच्याबद्दलची माहिती जमवली आहे. याच भागात सिनेमाचे शूटींग करण्याचा त्यांचा विचार आहे. तसेच नासा, कॅलिफोर्निया अशा ठिकाणीही शूटींग पार पडेल. या सिनेमातील कलाकारांचा अद्याप विचार झालेला नसला तरी मोठे कलाकार घेऊन ही निर्मिती तयार होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details