महाराष्ट्र

maharashtra

अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या डोळ्यावरही झाली शस्त्रक्रिया

By

Published : Mar 15, 2021, 6:59 PM IST

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतीच त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे. त्यांच्या एका डोळ्यावर मार्चच्या सुरुवातील शस्त्रक्रिया पार पडली होती.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी रविवारी रात्री उशिरा त्यांच्यावर दुसऱ्यांदा डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे. आता आपली तब्येत बरी असल्याचेही बच्चन यांनी कळवले आहे.

यापूर्वी मार्चच्या सुरूवातीस बॉलिवूडच्या मेगास्टार अमिताभने पहिल्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली होती. आयुष्य बदलवणाऱ्या या अनुभवा विषयी चाहत्यांना माहिती देताना अमिताभ यांनी आपल्या दुसऱ्या डोळ्याचीही शस्त्रक्रिया पार पडल्याचे सांगितले.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरुन ही माहिती चाहत्यांना दिली. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे दृष्टीचे अडथळे कसे दूर झाले याविषयी लिहिले होते.

दरम्यान, कामाचा विचार करता 'गुलाबो सीताबो' चित्रपटानंतर अमिताभ यांचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. सध्या त्यांचे तीन चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत. त्यात कल्पनारम्य-साहस असलेला 'ब्रह्मास्त्र', अजय देवगणचा 'मेडे' आणि थ्रिलर चित्रपट 'चेहरे' यांचा समावेश आहे.

नागराज पोपटराव मंजुळे यांच्या ‘झुंड’ नावाच्या चित्रपटातही बिग बी मुख्य भूमिका साकारली असून लवकरच विकास गुल यांच्या 'गुड बाय' या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.

हेही वाचा - मिस वर्ल्ड’ भारतीय हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा जोनास अनेक गोष्टींमध्ये पारंगत

ABOUT THE AUTHOR

...view details