महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 28, 2020, 6:09 PM IST

ETV Bharat / international

इराणमध्ये कोविड रुग्णांची संख्या 9 लाखांच्या पुढे

या रोगामुळे गेल्या 24 तासांत 482 लोक मृत्यू पावले आहेत. यासह आतापर्यंत 46 हजार 689 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्या, सीमा सदत लारी यांनी दिली'आतापर्यंत एकूण 6 लाख 33 हजार 275 लोक बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत येथे आयसीयूमध्ये 5 हजार 849 लोक आहेत,' असे लारी पुढे म्हणाल्या.

इराण कोरोना लेटेस्ट न्यूज
इराण कोरोना लेटेस्ट न्यूज

तेहरान - इराणच्या आरोग्य मंत्रालयाने कोविड - 19 चे 13 हजार 961 नवे रुग्ण सापडल्याचे म्हटले आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 9 लाख 8 हजार 346 वर पोचली आहे.

या रोगामुळे गेल्या 24 तासांत 482 लोक मृत्यू पावले आहेत. यासह आतापर्यंत 46 हजार 689 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्या, सीमा सदत लारी यांनी दिली.

हेही वाचा -ब्रिटनमध्ये 24 तासांत 696 मृत्यू, 5 मेपासूनची कोरोनाच्या बळींची सर्वाधिक आकडेवारी

'आतापर्यंत एकूण 6 लाख 33 हजार 275 लोक बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत येथे आयसीयूमध्ये 5 हजार 849 लोक आहेत,' असे लारी पुढे म्हणाल्या.

'इराणमध्ये कोरोना विषाणूसंसर्गाचे परीक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या 59 लाख 55 हजार 724 वर पोहोचली आहे,' असे वृत्त सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिले आहे.

ने अशी दिली की सध्या इराणच्या 27 प्रांतात संसर्ग होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे, अशी माहिती लारी यांनी दिली. इराणमध्ये 19 फेब्रुवारीला कोविड-19 चा पहिला रुग्ण सापडला होता.

हेही वाचा -अमेरिकेत कोरोनाचे बळी 2.6 लाखांवर, मार्च 2021 पर्यंत 4.7 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details