महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

बुर्किना फासोत दहशतवादी हल्ल्यात १४ ठार; १४६ दहशतवाद्यांना लष्कराने घातले कंठस्नान

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे लष्कराने शोधमोहीम राबवत १४६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

By

Published : Feb 6, 2019, 10:47 AM IST

दहशतवादी हल्ला

औगाडौगू- उत्तर बुर्किना फासोत माली सीमेजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे. यानंतर लष्कराने प्रत्युत्तरात बुर्किना फासोच्या उत्तरेकडील तीन प्रांतात शोधमोहीम राबवण्केयात आली. यावेळी लष्कराने १४६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

दहशतवाद्यांनी माली सीमेजवळ येटेंटा प्रांतातील केन शहरात हल्ला केला होता. केनमध्ये रविवारी तीन फेब्रुवारीला रात्री आणि सोमवारी चार फेब्रुवारीला झालेल्या जिहादी हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सैन्य दलाचे प्रवक्ते कर्नल लामौसा फोफाना यांनी दिली.

फोफाना म्हणाले, ‘प्रत्युत्तरात राष्ट्रीय संरक्षण दलांनी केन, बानह आणि बोम्बोरो येथे कारवाई केली. या तीन भागात हवाई दल आणि लष्कराने कारवाई करत १४६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.’
येथे २०१५ पासून जिहादी हल्ल्यात आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details