महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2020, 6:21 PM IST

ETV Bharat / international

इस्लामिक दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये मशिदींच्या तपासणीस प्रारंभ, अनेक बंद होण्याची शक्यता

फ्रान्सचे गृहमंत्री जेराल्ड डर्मेनिन याबाबत घोषणा करताना सांगितले की, काही मशिदी दहशतवाद किंवा फुटीरतावादाला प्रोत्साहन देत असल्याचा संशय आहे. असे आढळले तर, त्या बंद केल्या जातील. देशात नुकतेच अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. या घटनांमध्ये एका चेचन शरणार्थीने शिक्षक सॅम्युअल पॅटी यांचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचाही समावेश आहे. तसेच, या हत्येच्या दोन आठवड्यांनंतर फ्रान्सच्या नाइस शहरात एका कॅथेड्रलमध्ये चाकूच्या हल्ल्यात तिघांची हत्या करण्यात आली. इस्लामिक दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत.

फ्रान्स दहशतवादविरोधी कारवाई न्यूज
फ्रान्स दहशतवादविरोधी कारवाई न्यूज

पॅरिस - इस्लामिक कट्टरतावाद, फुटीरतावाद आणि दहशतवाद यांना प्रोत्साहन देत असल्याचा संशय व्यक्त होत असलेल्या मशिदींची फ्रेंच अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली आहे. शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, फ्रान्स इस्लामिक कट्टरतावादाविरुद्ध अस्तित्वाच्या लढाईत गुंतला आहे.

गृहमंत्री जेराल्ड डर्मेनिन याबाबत घोषणा करताना सांगितले की, काही मशिदी दहशतवाद किंवा फुटीरतावाद यांना प्रोत्साहन देत असल्याचा संशय आहे. असे आढळले तर, त्या बंद करण्यात येतील.

हेही वाचा -पाकिस्तान : पंजाब प्रांतात 52 टक्के सक्तीची धर्मांतरे

ऑक्टोबर महिन्यात फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी पॅरिसमधील एक प्रसिद्ध मशीद सहा महिन्यांसाठी बंद केल्यावर हे पाऊल उचलण्यात आले आहे. फ्रान्समध्ये नुकतेच अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. याविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. या घटनांमध्ये एका चेचन शरणार्थीने शिक्षक सॅम्युअल पॅटी यांचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचाही समावेश आहे. या मशिदीत जवळजवळ 1 हजार जवळपास 500 उपासक होते. या मशिदीबाबतच एक व्हिडिओ पॅटी यांनी फेसबुकवर पोस्ट केला होता. तसेच, पॅटी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच्या वर्गातील चर्चेदरम्यान मुहम्मद पैगंबर यांची दोन व्यंगचित्रे दाखविली होती. याबद्दल मशिदीने त्यांच्यावर टीका केली होती.

पॅटी यांच्या हत्येच्या दोन आठवड्यांनंतर फ्रान्सच्या नाइस शहरात एका कॅथेड्रलमध्ये चाकूच्या हल्ल्यात तीन जणांची हत्या करण्यात आली.

'येत्या काही काळात फुटीरतावादाला चालना देण्यासाठी संशयास्पद मशिदींची तपासणी केली जाईल. जे असे करत आहेत त्या बंद केल्या जातील,' असे डर्मेनिन म्हणाले.

2015 मधील शार्ली हेब्दो हत्याकांडानंतर फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यांनंतर मॅक्रॉन यांच्यावर सतत दबाव येत आहे. 2015 पासून इस्लामिक हिंसाचारामुळे 240 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. या हल्ल्यांवरून विरोधी पक्ष सरकारवर सतत निशाणा साधत आहेत.

हेही वाचा -काबुलमध्ये अफगाण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details